02 March 2021

News Flash

बोगस डॉक्टर सुषमा कोठारी गजाआड

मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सुषमा कोठारी हिला विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी गजाआड केले.

| September 11, 2013 02:36 am

मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सुषमा कोठारी हिला विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी गजाआड केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी बोगस डॉक्टर कोठारी हिचे प्रकरण लावून धरले होते. कोठारी हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला.
महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अमृता इंगळे यांनी दोन महिन्यांपूर्वी विश्रामबागवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. असाध्य रोग अॅक्युपंक्चरच्या माध्यमातून बरे करण्याचा दावा करून कोठारी हिने रुग्णांची दिशाभूल केली असल्याची तक्रार डॉ. दाभोलकर यांनी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानंतर देशमुख यांनी कोठारी हिच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. विश्रामबागवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कोठारी हिने जामीन मिळविला होता. दरम्यान, न्यायालयाने तिचा अंतरिम जामीन मंगळवारी फेटाळून लावला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर गुन्हे शाखेने बोगस डॉक्टर, भोंदू बाबा, मांत्रिक यांची चौकशी केली होती. दाभोलकर यांच्या आंदोलनामुळे आर्थिक हितसंबंध दुखावल्या गेलेल्यांकडून सुपारी देऊन त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने शहरातील काही जणांची चौकशी करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 2:36 am

Web Title: fake doctor sushma kothari arrested
Next Stories
1 अवैध वाहतुकीसाठी चिंचवडला दरमहा १८ लाखांची ‘हप्तेगिरी’
2 पावसाचे पुनरागमन
3 अमली पदार्थबंदीची महाविद्यालयांत प्रभावी अंमलबजावणी करावी– विद्यापीठ अनुदान आयोग
Just Now!
X