कर्जबाजारी झाल्याने पिंपरी चिंचवडमधील एक कुटुंब सुसाईड नोट लिहून दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालं होतं. ५ डिसेंबर रोजी आई-वडील आणि दोन्ही मुलं घर सोडून आत्महत्या करतो असे चिट्ठीत नमूद करून बेपत्ता झाले. संतोष शिंदे, सविता शिंदे असं दांम्पत्या आणि मुकुंद शिंदे आणि मैथली शिंदे अशी मुलांची नावं आहेत. दोन ते अडीच कोटींचे अंगावर कर्ज त्यांच्या अंगावर असून ते दोन ही बेपत्ता आहेत. पिंपरी पोलीस अद्यापही त्यांचा शोध घेत आहेत.परंतु,त्यांना यश येताना दिसत नाही.

शिंदे कुटुंब हे डिसेंबर महिन्यात सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाले होते. त्यानंतर दोन महिन्यात पिंपरी पोलिसांनी नातेवाईक, शेजारी, ओळखीच्या व्यक्तींकडे चौकशी केली परंतु, अद्यापही ते कुटुंब गेले कुठे असा ठोस पुरावा पोलिसांना मिळत नाही. त्यामुळे त्या कुटुंबाचे झाले तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. संतोष शिंदे यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज होते काही महिन्यांपासून ते कर्जाचे हप्ते भरू शकत नव्हते. बँकांनी त्यांच्या मागे ससेमिरा सुरू ठेवला होता. आता बँक मालमत्ता जप्त करणार आहे हे लक्ष्यात येताच शिंदे कुटुंब सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालं होत. अनेक बँकांकडून त्यांनी कर्ज घेतले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सुसाईड नोट मध्ये “कर्जबाजारीपणाला मी एकटाच जबाबदार असल्याने अन्य कोणाला दोषी धरू नये. मी स्वतःच घर सोडून निघून चाललो आहे. आम्ही चौघे ही आत्महत्या करणार आहोत, हा आमचा सर्वस्वी निर्णय आहे.” असं नमूद करण्यात आलं होतं.

तांत्रिक बाबीमुळे संबंधित कुटुंबाच्या शोधात अडचणी येत आहेत.सर्वांचे मोबाईल घरात सापडलेले आहेत.नातेवाईक,जवळचे व्यक्ती,मित्रपरिवार यांच्याकडे चौकशी केलेली आहे.ते परराज्यात गेले आहेत की महाराष्ट्रात आहेत याविषयी तपास सुरू आहे.
कल्याण पवार-वरिष्ठ पोलीस निरीक्षक