पुण्याचे हक्काचे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवरूनच सुरू झाल्या आहेत. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सात गावांमध्ये बागायती क्षेत्र असल्याने विमानतळ प्रकल्प पुरंदर तालुक्यातच, मात्र विद्यमान जागेच्या पुढील तीन गावांमध्ये राबवण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहेत.

विमानतळासाठी २८०० हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी शासनस्तरावरून आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. सुरुवातीला २८०० पैकी २०००  हेक्टर भूसंपादन थेट खरेदीने करण्याचेही निश्चित झाले असल्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कं पनीने (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कं पनी- एमएडीसी) प्रकल्पासाठी आवश्यक जमिनींचे दर निश्चित करण्याचे काम सुरू के ले आहे. याशिवाय जिल्ह्य़ात पुरंदर आणि त्यातील निवडलेली सात गावे सोडून इतर कोणतीही जागा विमानतळासाठी योग्य नसल्याचा निर्वाळा भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – एएआय) दिला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक बहुतांशी जागांचे सर्वेक्षण झाले असून के ंद्र, राज्य सरकारसह संरक्षण विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे आता जागेत बदल करणे योग्य होणार नाही. याशिवाय भविष्यात विमानतळ विस्तारीकरणासाठी पांडेश्वर, रिसे आणि पिसे ही तीन गावेही समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी भूमिका तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतली होती.

दरम्यान, विमानतळ प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कु ंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या

सात गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात बागायती क्षेत्र आहे. त्याऐवजी दोन किलोमीटर पूर्वेला पांडेश्वर, रिसे आणि पिसे या तीन गावांच्या परिसरात विमानतळ करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक जागा या तीन गावांतून मिळू शके ल. तसेच या गावांमध्ये फारसे बागायती क्षेत्र नाही, असा दावा करण्यात येत आहे.

विमानतळाची जागा बदलल्यास भूसंपादनात विशेष अडचणी येणार नाहीत. कारण नव्या तीन गावांत बागायती क्षेत्र फार नाही, असे निदर्शनास आले आहे. याशिवाय विमानतळ पुरंदरमध्येच होणार असल्याने पुन्हा भौगोलिक सर्वेक्षण करण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र, याबाबतचा निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाईल.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी