खेडच्या भामा आसखेड धरणात एक शेतकरी बुडाला आहे. ज्ञानेश्वर गुंजाळ (वय ३५) असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आत्महत्या केली की हा अपघात आहे, याचा चाकण पोलीस तपास करत आहे.

भामा आसखेड धरणाच्या पाण्यात शेतकरी बुडल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. गुंजाळ हे सकाळी भामा आसखेड धरणावर आले होते. त्यांनी तेथील धरणाच्या पाण्यात तोंड, हात, पाय धुतले आणि धरणाच्या पाण्यात उडी मारली. यानंतर ते बुडाल्याचे काही प्रत्यक्षदर्शी महिलांनी पोलिसांना सांगितले. गुंजाळ यांनी आत्महत्या केली की हा अपघात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अग्निशमन दलाच्या मदतीने गुंजाळ यांचा शोध घेत आहेत.
ज्ञानेश्वर हे धरणग्रस्त शेतकरी असल्याची प्राथमिक समोर येत आहे. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करत आहे.