News Flash

मुलीला छेडणाऱ्या तरूणाला वडिलांनी चोपले

अनेक दिवसांपासून करत होता मुलीचा पाठलाग

पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरूणाला वडिलांनी आणि मुलीच्या आत्याने चोप दिल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिंपरी येथे घडली. दरम्यान, चोप दिल्यानंतर तरूणाला थेट पोलिस ठाण्यात नेण्यात आल आहे. लहू धुंड (वय-२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो सातत्याने या मुलीचा पाठलाग करत असे, आजतर मुलीला एकटीला पाहून त्याने तिचा हात हातात घेत मी तुझ्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले. दरम्यान मुलीच्या मागोमाग येत असलेल्या तिच्या वडिलांनी आणि आत्याने हा प्रकार पाहाताच त्याला धरून चोप दिला.  लहू हा माझा पाठलाग करत असल्याचे मुलीने वडिलांना काही दिवसापूर्वीच सांगितले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने अनेक दिवसांपासून आरोपी लहू पाठलाग करत असल्याची माहिती घरच्यांना दिली होती. त्यानुसार वडील आणि आत्या हे आरोपीला पकडण्यासाठी मुलीचा पाठलाग करत होते. अखेरीस आज ही मुलगी महाविद्यालयात जात असताना तिचा मागोमाग आलेल्या वडिलांनी आणि आत्याने लहूला पकडले. यानंतर त्याला चोप देत पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी लहूला पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 6:54 pm

Web Title: father beaten boy because he teasing his girl msr 87
Next Stories
1 पुणेकारांची पाणी कपातीच्या संकटातून होणार सुटका
2 मटणाचे दुकान चालवण्यासाठी चोरायाचा शेळ्या
3 पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी पकडला १०१ किलो गांजा
Just Now!
X