27 February 2021

News Flash

सिंहगड कँम्पस संरक्षक भिंत दुर्घटना; सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

सदोष मनुष्य वधाचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये दाखल

पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड कँम्पसची संरक्षकभिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याप्रकरणी जागा मालक, इमारत विकासक, ठेकेदार, सिंहगड इन्स्टिटय़ुटचे सौ वेणूताई चव्हाण तंत्र निकेतन कॉलेज, आंबेगाव बुद्रुक पुणेचे व्यवस्थापक, बांधकाम विभागाचे काम पाहणारे अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत ठार झालेले मजूर छत्तीसगढचे रहिवासी असल्याची माहिती आहे. तर घटनेनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 10:11 pm

Web Title: fir has been registered connection with wall collapse incident msr87
Next Stories
1 राज्यात ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; घाटात पर्यटनासाठी न जाण्याचा सल्ला
2 येरवडा कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी; एकजण जखमी
3 पुणे भिंत दुर्घटना: वाचवा वाचवा! एवढंच ऐकू येतंय; बचावलेल्या महिलेने सांगितला अनुभव
Just Now!
X