पिंपरीतील थेरगाव भागात लागलेल्या एका ट्रान्सफॉर्मरला आग लागली. या आगीत एक चारचाकी टेम्पो आणि एक दुचाकी जळून खाक झाली. ही पावणेनऊच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी तातडीने येत ही आग नियंत्रणात आणली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठी हानी टळली. या ट्रान्सफॉर्मरच्या शेजारीच एक लाकडी वखार आहे. आगीचे लोट वखारीपर्यंत पोहचले असते तर आगीचा भडका उडाला असता. मात्र तसे होऊ न देता प्रयत्नांची शर्थ करत अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2018 रोजी प्रकाशित
पिंपरीतील थेरगावमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग
अग्निशमन दलाने येऊन तातडीने आग नियंत्रणात आणल्याने मोठी हानी टळली
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 29-09-2018 at 11:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at transformer at thergaon pimpri now in control