राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आजित पवार यांच्या मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील फार्म हाऊसला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग इतकी मोठी होती की त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. त्यामुळे या आगीत मोठी वित्तहानी झाल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. सध्या आग आटोक्यात आल्याचे सुत्रांकडून कळते.

मुळशी तालुक्यातील घोटावडे गावात हे फार्म हाऊस असून ते मुळा नदीच्या काठाजवळ बांधण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या इमारतीला आग लागली. आग इतकी मोठी होती की त्यामुळे काळ्या धुराचे ढग परिसरात पसरले होते. आगीची तीव्रता लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी अग्निशामन दलाला माहिती दिली, त्यानंतर आग विझवण्यासाठी दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

या फार्म हाऊसवरुन न्यायालयीन वाद सुरु असल्याने काही दिवसांपूर्वी ते चर्चेत आले होते.