पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी पाच जणांची चाचणी ही निगेटिव्ह आली असून त्यांना उद्या (रविवारी) सकाळी नऊ च्या सुमारास डिस्चार्ज देण्यात येणार आहेत. शुक्रवारी तीन जणांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील ऐकून आठ रुग्ण हे ठणठणीत बरे झाले आहेत. शहरात ऐकून १२ करोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर शहरात एक ही रुग्ण आढळलेला नाही.

दुबईहुन आलेल्या तरुणामुळे कुटुंबातील चार जणांना करोना ची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना भोसरी येथील नवीन रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर १४ दिवस उपचार करत पहिली आणि दुसरी चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. तर दुसरा रुग्ण हा थायलंड येथून शहरात परतला होता. त्याची टेस्ट ही पॉजीटिव्ह आल्याने घाबरून रुग्णालयातून धूम ठोकली होती. अथक प्रयत्नानंतर पोलीस आणि आरोग्य विभागाने त्याला शोधून काढत पुन्हा भोसरी येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर डॉक्टरांनी परिश्रम घेत योग्य पद्धतीने उपचार केले असून त्याच्या दोन्ही टेस्ट या निगेटिव्ह आल्या आहेत. पाच ही करोनामुक्त व्यक्तींना रविवारी भोसरी येथील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दरम्यान शहरातील करोना बाधितांचा आकडा कमी झाला असून १२ पैकी ८ रुग्णांना डॉक्टरांनी ठणठणीत बरे केले आहे.