15 August 2020

News Flash

फ्लॅटधारकाची सुरक्षा रक्षकाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाची पोलिसात तक्रार

पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा रक्षकाला फ्लॅट धारकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सुदाम चव्हाण असे मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. वाकड मधील वर्धमान सोसायटीत हा प्रकार घडला आहे. वाकड पोलिसात सुरक्षा रक्षक सुदाम यांनी फ्लॅट धारक सुभाष कस्पटे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास वाकडच्या वर्धमान सोसायटीत सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली. वर्धमान सोसायटीमध्ये काही व्हिजिटर आले होते. त्यांना २०८ नंबर च्या फ्लॅटमध्ये जायचं होतं. मात्र चुकून सुरक्षा रक्षक सुदाम यांनी सुभाष कस्पटे यांचा फ्लॅट चा नंबर दिला. सुभाष यांना तुमच्याकडे व्हिजिटर आले आहेत असा चुकीने संदेश गेला. त्यामुळे सुभाष यांचं म्हणणं आहे की, त्यांना माझ्या घरी का पाठवलं चुकीचा नंबर का दिला? असा त्यांचा गैरसमज झाला. या गैरसमजातूनच त्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. या घटने प्रकरणी सुरक्षा रक्षक सुदाम चव्हाण यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 7:57 pm

Web Title: flat owner beat security guard in pimpri scj 81
Next Stories
1 माणुसकी गोठली! पुण्यात गारठवणाऱ्या थंडीत सापडली जुळी अर्भक
2 पुढील सहा दिवस पुण्याच्या गारठ्यात चढ-उतार
3 पुणे- पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास, मृतदेह पाहून सात वर्षीय चिमुरडीने फोडला टाहो
Just Now!
X