07 August 2020

News Flash

पिंपरी-चिंचवड, पुणेकरांना लॉकडाउनमधून एकदिवसासाठी दिलासा, जाणून घ्या काय केलाय बदल

थोडासा दिलासा...

 

करोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी पुण्यात मंगळवारपासून कठोर लॉकडाउन सुरु आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दहा दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यात १४ जुलैपासून कठोर लॉकडाउनची अंमलबजावणी सुरु आहे. जीवनावश्यक वस्तू, मटन, चिकन, मासे, अंडी विक्रीची सर्व दुकाने बंद होती.

पण उद्या रविवारचा एकदिवस नागरिकांना लॉकडाउनमधून थोडा दिलासा देण्यात आला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करता यावी यासाठी लॉकडाउन थोडा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार उद्या रविवारी जीवनावश्यक वस्तुंची, किरकोळ, मटन, चिकन, मासे, अंडी विक्रीची सर्व दुकाने सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत चालू राहणार आहेत. त्यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. फक्त एक दिवसासाठी ही सवलत देण्यात येणार आहे. सुरक्षित अंतर राखून नियमांचे पालन करुन नागरिकांनी खरेदी करावी असे आदेशामध्ये म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडलाही दिलासा

पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांचे लॉगडाऊन लागू करण्यात आले असून उद्या 19 जुलै साठी लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असून केवळ उद्या सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरू राहतील, परंतु, त्यानंतर 20 जुलै ते 23 पर्यंत आधी लागू केलेल्या नियमांनुसार सकाळी 8 ते 12 पर्यंत जीवनावश्यक दुकाने सुरू होणार आहेत. संभाव्य गर्दी टाळण्यासाठी महानगर पालिकेने हा निर्णय घेतला आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 5:53 pm

Web Title: for single day lockdown relaxation in pune dmp 82
Next Stories
1 करोनाच्या संकटात परदेशी तरुणीचा व्हाट्सअ‍ॅपद्वारे देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांनी केला पर्दाफाश
2 संगीतात नवे प्रयोग महत्त्वाचे!
3 अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया राबवण्यास एमपीएससी तयार
Just Now!
X