News Flash

बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांला अटक

एक हजार रुपयांची बनावट नोट चलनात आणताना एका नायजेरीय विद्यार्थ्यांला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध

| March 17, 2013 01:33 am

एक हजार रुपयांची बनावट नोट चलनात आणताना एका नायजेरीय विद्यार्थ्यांला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
कार्ल जोसेफ आस्तुझ (वय २३, रा. माणिकचंद सोसायटी, लुल्लानगर, मूळ- नायजेरीयन) असे अटक केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो लष्कर भागातील अरिहंत कॉलेजमध्ये बीसीएच्या तिसऱ्या वर्षांला शिकत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ल याने शुक्रवारी रात्री साळुंके विहार रस्त्यावरील चाय हॉटेल येथे जेवन केले. जेवनाचे बील दोनशे चाळीस रुपये झाले होते. त्यानंतर त्याने हजार रुपयांची नोट हॉटेलमालकाला दिली. त्याने ही नोट शेजारच्या पेट्रोलपंपावर जाऊन तपासली असता ही नोट बनावट असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ कोंढवा पोलिसांना फोन करून बोलविले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी कार्ल याला ताब्यात घेऊन अटक केली. कार्ल हा पूर्वी राहत असलेल्या ठिकाणी त्याच्या मित्रांना अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे तेथील मालकाने त्यांना खोली सोडून जाण्यास सांगितले होते. आता त्याचे कोण साथीदार आहेत का? त्याने ही बनावट नोट कोठून आणली, त्याच्याकडे आणखी बनावट नोटा आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. थोपटे हे अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 1:33 am

Web Title: foreign student arrested in fake note case
Next Stories
1 उच्च न्यायालयात जाण्यास गदादे यांना सहा एप्रिलपर्यंत मुदत
2 येरवडा कारागृहास बनावट मशिन देऊन सव्वा बारा लाखांची फसवणूक
3 एलबीटी विरोधातील ‘बंद’ ला बाजारपेठांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
Just Now!
X