साताऱ्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचे शरद पवारांचे निर्देश

देशमुख हे उत्कृष्ट अधिकारी आहेत. माझ्या डाव्या बाजूला रामराजे निंबाळकर आणि उजव्या बाजूला देशमुख बसले आहेत. ही जोडी ठीक दिसत आहे. माणदेशातील प्रश्नांसबंधी देशमुख कार्यरत राहतीलच, मात्र त्यांनी आता रामराजे निंबाळकरांच्या बरोबरीने साताऱ्याच्या राजकारणात सक्रिय व्हावे. सातारकरांनी येणाऱ्या काळात याकडे लक्ष ठेवावे, अशी सूचक टिप्पणी करत पवारांनी प्रभाकर देशमुखांना राजकारणात सक्रिय होण्याचे निर्देश दिले. त्यामुळे देशमुख निवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी

माण गौरव समितीच्यावतीने माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संभाजीराजे, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, आमदार जयकुमार गोरे, सिंधुताई सपकाळ या वेळी उपस्थित होत्या.

पवार म्हणाले,‘ देशमुखांनी माण-खटाव या आपल्या गावात गावकऱ्यांच्या मदतीने जलसंधारणाची केलेली कामे वाखाणण्याजोगी आहेत. गावे जेव्हा अशी एकत्र येऊन काम करतात, तेव्हा लोकप्रतिनिधींनीदेखील त्यांना सर्वतोपरी मदत करणे गरजेचे असते.’ शिवतारे म्हणाले,‘जलयुक्त शिवार योजनेचा जन्म माण-खटाव तालुक्यातच झाला. मुख्यमंत्र्यांनी ही कामे पाहून राज्यभर अशीच कामे आवश्यक असल्याचे सांगितले. देशमुखांनी निवृत्तीनंतर जलसंधारण देखरेख समितीचे प्रमुखपद सांभाळावे, याबाबत मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे.’

‘जलसंधारण, शिक्षण आणि कौशल्य विकास या तीन गोष्टींवर येणाऱ्या काळात मी काम करणार आहे. मला आनंद देणाऱ्या कामातच आगामी काळात कार्यरत राहणार आहे. त्यामुळे मी सेवानिवृत्त झालो असे वाटत नाही’, अशा भावना देशमुख यांनी व्यक्त केल्या.

मंत्र्यांची टोलेबाजी आणि हंशा 

देशमुखांना जलसंधारण देखरेख समितीचे प्रमुखपद द्यावे, या शिवतारेंच्या वक्तव्याला जानकरांनी पाठिंबा दर्शवला. यावर बापट म्हणाले, ‘जानकरांनी पाठिंबा दिला हे ठीक, परंतु याबाबत शिवतारेंनी आधी उद्धवजींना विचारले आहे काय? असा टोला लगावला. देशमुखांनी काय करायचे ते ठरवले असणार. ते पवारांच्या तालमीतले असल्याने कधी काय होतील, हे आपल्याला कळणार नाही.’ यावर सभागृहात एकच हंशा पिकला.