खगोल शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने शुक्र ग्रहावरील वातावरणात फॉस्पीन वायूचा शोध लागल्याची घोषणा केल्याने त्या ग्रहावर सजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी’मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधामध्ये खगोल शास्त्रज्ञांच्या एका पथकाने शुक्रावरील वातावरणात फॉस्पीन वायूचे अंश आढळल्याचा दावा केला आहे. फॉस्फिन हा रंगहीन वायू काही जीवाणू ऑक्सिजनशिवाय अस्तित्व टिकवण्यासाठी तयार करतात.