रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी पाचच्या सुमारास वाकड परिसरातील कस्पटे वस्ती येथे करण्यात आली. विक्रांत सुभाष कांबळे वय-२० अस अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण कस्पटेवस्तीकडून एम.एच- १२ क्यू.एक्स- ९४६८ या क्रमांकाच्या बुलेटवरून हिंजवडीच्या दिशेने जात असून त्याच्याकडे पिस्तुल आहे अशी गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक हनुमंत बांगर यांना मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी वाकड ब्रिज जवळ सापळा रचून सराईत गुन्हेगार विक्रांत कांबळेला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता ११ हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
Geographical mind Geographical knowledge about the battlefield
भूगोलाचा इतिहास: भौगोलिक बुद्धिबळ
israeli air strike destroys iranian consulate in syria
सिरीयातील इराणच्या दूतावासावर इस्रायलचा हवाई हल्ला; किमान ६ ठार झाल्याचा युद्धविरोधी संस्थेचा दावा
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश

त्यानुसार त्याच्यावर विनापरवाना पिस्तुल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो रावण साम्राज्य टोळीचा गुन्हेगार असल्याच पोलिसांनी सांगितले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरीश माने आणि हनुमंत बांगर यांच्या पथकाने केली आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.