कोरोना व्हायरसमुळे जगभरात निर्माण झालेल्या अस्वस्थतेनंतर, रेस्टॉरंट्स आणि कॅफे हळूहळू ग्राहकांसाठी दारे उघडत आहेत. लोकांची हॉटेलमध्ये जेवण्याची वारंवारिता सातत्याने वाढत आहे. पुण्यातील एका कॅफेने तर ग्राहकांना आमंत्रित केले आहेच परंतु त्यांनी कॅफेमध्ये कुठल्या गोष्टी करू नये याची विचित्र यादीही मेनू कार्डवर दिली आहे.

पुण्याच्या बाणेरमधील इराणी कॅफेने मेनू कार्डवर छापलेल्या ग्राहकांसाठीच्या असामान्य सूचना वाचून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा कॅफे आपल्या ग्राहकांना बर्‍याच गोष्टी करण्यास मनाई करतो. त्यातील काही आनंददायक आहेत तर काही पूर्णपणे विचित्र आणि हास्यास्पद आहेत.

मनाई करण्याची लांबलचक यादी पुढीलप्रमाणे आहे: लॅपटॉप वापरायचा नाही, धूम्रपान करायचे नाही, कोणतेही क्रेडिट नाही, बाहेरील पदार्थ चालणार नाहीत, जोरात बोलणे नाही, सौदेबाजी करणे, विचार बदलणे नाही, काडेपेटी वापरायची नाही, जुगार खेळण्याविषयी चर्चा नाही, कंगवा वापलेला चालणार नाही, दात घासणे नाही, खुर्चीवर पाय ठेवायचे नाही, झोपलेलं चालणार नाही, पळून जायचे नाही, टेबलाखाली चुईंग गम लावायचं नाही, मोबाईलवर गेम्स खेळायच्या नाहीत, फूड कूपन्स नाहीत, कॅशियरबरोबर फ्लर्टिंग करायची नाही, कोणताही विनामूल्य सल्ला द्यायचा नाही”