15 November 2019

News Flash

पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील हडपसर येथील उंड्री येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा जाधव आणि अक्षय चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. अक्षय चव्हाण याने शनिवारी दुपारच्या सुमारास कृष्णा जाधव याची प्रकृती ठीक नाही अशी खोटी बतावणी केली. त्यानंतर अक्षयने पीडित महिलेला गाडीवर घेऊन जात असताना काळेपडळ येथे कृष्णा त्यांना भेटला. तेथून उंड्री येथील चौकात गेल्यावर अक्षय आणि कृष्णाने एका दुकानातून दारूची बाटली विकत घेतली. त्यानंतर तेथून जवळ असलेल्या डोंगरावर महिलेला घेऊन गेले आणि दारू पाजली. यानंतर दोघांनी तिच्या बलात्कार केला. पोलीस याप्रकरणी तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

First Published on May 27, 2019 12:21 pm

Web Title: gangrape in pune