20 February 2018

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या

पोलिसांनी प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले

पिंपरी-चिंचवड | Updated: November 14, 2017 6:39 PM

मृत पूजा सुनील आल्हाट

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणीने आत्महत्या केली आहे. पूजा सुनील आल्हाट (वय २२ रा.आल्हाटवाडी मोशी) असे मृत तरुणीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर पंकज उर्फ अर्जुन कैलास सस्ते (वय २८ रा.मोशी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा आणि पंकज यांच्यात गेल्या एका वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. पूजाने लग्नाचा विषय काढल्याने गेल्या काही दिवसांपासून दोघात दुरावा निर्माण झाला होता. पंकज तिच्याशी बोलणे देखील टाळत होता. सोमवारी सकाळी ११ वाजता पूजा घराबाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत पूजा घरी आली नसल्याने कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरु केली. सकाळी शेतातील विहिरीजवळ तिचा मोबाईल आढळल्याने तिने आत्महत्या केल्याचा संशय बळावला. याप्रकरणी तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.

पंकज आणि पूजा यांच्यात व्हॉटसअॅपवरील संभाषण मोबाईलमध्ये तसेच होते. यात पूजाने तू मला का फसवलेस असा संदेश पंकजला पाठवल्याचे समोर आले आहे. पूजा ही सुशिक्षित होती. तसेच पंकजचे कपड्यांचे दुकान आहे. एकाच गावात असल्याने त्यांचे प्रेमप्रकरण जुळले होते. भोसरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

भोसरीत कौटुंबिक वादातून तरुणीची आत्महत्या

दुसरीकडे पिंपरी- चिंचवड मधील भोसरी येथे १७ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सकाळी पाचच्या सुमारास तिने आत्महत्या केली. जयश्री पाटोळे असे या तरुणीचे नाव आहे. जयश्री फुलेनगर परिसरात राहत होती. रात्री ती स्वयंपाक घरामध्ये झोपली होती. सकाळी तिच्या आई-वडिलांनी दरवाजा ठोठावला.  परंतु तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर तिने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. जयश्री ही नेहमी घराबाहेर राहायची त्यामुळे तिचे वडिलांसोबत पटत नव्हते, अशी माहिती समोर येत आहे. वडिलांसोबतच्या वादाला कंटाळून तिने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. जयश्रीला तीन बहिणी आणि दोन लहान भावंडे आहेत.

 

First Published on November 14, 2017 4:57 pm

Web Title: girl committed suicide love affair in pimpri chinchwad
  1. J
    jitendra
    Nov 14, 2017 at 7:05 pm
    I थिंक don'त उंडरस्टॅंड गर्ल्स ऑफ हो लव्ह शे त्यांन मुलगा हा त्याचा स्वभाव बगुन रेलशनशिप माडे राहावे नाही त्याची sundarata या paisa याचा विचार करणे गरजेचे ahe
    Reply