मडगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावरून हमीद दाभोलकर यांची टीका

‘‘मडगाव बाँबस्फोटाचा तपास २००९ मध्ये नीट झाला असता तर दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांचे खून टळू शकले असते हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्या बाबतीत अक्षम्य दिरंगाई व हेळसांड झाली. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेले आरोपपत्र हे छोटे, पण महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल,’’असे मत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.

‘आपले साधक निर्दोष असल्याचे सनातन संस्थेस कलबुर्गी यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांनी तपासासाठी एक विशेष पथक बनवले आहे. या पथकाचे प्रमुख हेमंत िनबाळकरवाटत\ असेल तर त्यांनी त्यांना न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचा संदेश द्यावा. त्यांना शरण यायला लावावे व न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा,’ असेही ते म्हणाले.

सीबीआयने दाभोलकरहत्या प्रकरणी बुधवारी आरोपपत्र दाखल केले. वीरेंद्र तावडे हा या कटाचा सूत्रधार असल्याचा, तसेच सारंग अकोलकर व विनय पवार हे त्यात प्रत्यक्ष सहभागी असल्याचा आरोप त्यात ठेवण्यात आला आहे. याबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता डॉ. हमीद म्हणाले,‘‘फरार व्यक्तींसह या घटनेत वापरले गेलेले हत्यार व गाडी पकडले जात नाही तोपर्यंत हे पूर्णत्वास जाणार नाही. दाभोलकर यांच्या विचारांच्या विरोधात ज्यांनी या तरुणांना भडकावले त्यांच्यापर्यंत तपास पोहोचायला हवा. या प्रकरणातील प्रमुख संशयित गेली सहा वर्षे फरार आहेत. राष्ट्रीय अन्वेषण संस्था व सीबीआय यांनी एकत्रितरीत्या तपास करून अकोलकर व पवार यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. फरार संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत या स्वरुपाचे आणखी गुन्हे होण्याची शक्यता तशीच राहते.’’