News Flash

चावा घेणाऱ्या कुत्र्याला पकडून बेदम मारले

गुन्हा दाखल, प्राणीप्रेमींची संबंधीत व्यक्तीस अटक करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवडमध्ये कुत्र्याला बेदम झोडपण्यात आल्या केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी दुपारी एका महिलेस कुत्रा चावल्याने तिच्या मुलाने त्या कुत्र्यास दोरीने बांधून काठीने बेदम झोडपले. कुत्र्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. बसलिंग घायगुळे (वय-५०) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्राणीप्रेमी नागरिकांनी या व्यक्तीस अटक करावी अशी मागणी केली आहे. याप्रकरणी कृष्णा जमादार  यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीत मंगळवारी बसलिंग घायगुळे हे कामावरून आले. तेव्हा, त्यांच्या वयस्कर आईला कुत्र्याने चावा घेतल्याचे त्यांना समजले. त्यांनी त्या कुत्र्याचा परिसरात शोध घेऊन त्याला पकडले. यानंतर त्या कुत्र्यास दोरीने बांधून लाकडी दांडक्याने बेदम मारले. दरम्यान, घटनास्थळी हजर असलेल्यांपैकी काहीजणांनी याचा व्हिडिओ केला व तो आता सर्वत्र व्हायरल होत आहे. घटने प्रकरणी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी हॉटेल समोर नेहमी कुत्रा बसतो या रागातून कामगाराने कुत्र्याला चाकू भोसकून ठार केल्याची घटना वाकड परिसरात घडली होती. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 11:00 pm

Web Title: he grabbed a dog and beaten him msr 87
Next Stories
1 आघाडीतल्या नेत्यांवर पक्षांतरासाठी भाजपाने दबाव टाकला, राजू शेट्टींचा आरोप
2 पुणे – गणपती मंदिरातील दानपेटी चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद
3 लोणावळा : पाण्याच्या भोवऱ्यातील मृतदेह काढताना पोलिसांची जीवघेणी कसरत
Just Now!
X