पुणे आणि पिंपरी शहरात व्हॉटसअॅप ग्रूपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हिंजवडी परिसरातून या रॅकेटची सूत्रे हलवली जात होती. अनेक उच्चशिक्षित तरूण-तरूणी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समजते. त्यामुळे पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात उच्चशिक्षित तरुण या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले असून, संकेतस्थळावरील मोबाईल नंबरच्या माध्यमातून देह व्यापाराचा धंदा नियोजित पद्धतीने सुरु होता. त्यानंतर व्हॉटसअॅपच्या माध्यमातून तरूणी ग्राहकांशी संपर्क साधत. देहविक्रीसाठी ५ हजारपासून ते ४० हजार रूपयांचे दर निश्चित करण्यात आले होते. संबंधित तरुणी मोबाईलच्या माध्यमातून काम करत असल्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान होते. पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडीत नोकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर परराज्यातील तरुण-तरुणी नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले. एका बाजूला शहराचा विकास होतानाचे चित्र असताना हायप्रोफाईल वेश्या रॅकेटमुळे शहरात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वेगवेगळे ग्रुप व्हॉटसअॅपच्या माध्यमातून या अवैध व्यवसायात सुलभपणे सक्रिय होतानाचे चित्र दिसते.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
gadchiroli lok sabha , sironcha polling station, evm technical glitch, new evm machine, aheri, helicopter, lok sabha 2024, election 2024, polling station, polling day, gadchiroli news, gadchiroli polling news,
ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, सिरोंचातील मतदान केंद्रावर गोंधळ; अहेरीवरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात…
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

शहरातील भीषण परिस्थिती रोखण्यासाठी पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, यापूर्वीही अशाप्रकारची कारवाई करण्यात आली आहे. या व्यवसायातील दलालांना अटकही करण्यात आली आहे. याविषयी कोणाला माहिती असेल तर त्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.