News Flash

हिंजवडीतील संगणक अभियंता तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओची मागणी

फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपला व्हॉट्सअॅप असलेला नंबर किंवा नियमित वापरातील मोबाईल नंबर ठेवू नये.

संग्रहित छायाचित्र

हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या संगणक अभियंता तरुणीकडे व्हॉट्स अॅपवर एक मिनिटाचा अश्लील व्हिडिओ मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणीला ज्या क्रमांकावरुन हा मेसेज पाठवण्यात आला तो क्रमांक परदेशातील असल्याचे समोर आले आहे. व्हिडिओ न पाठवल्यास खासगी फोटो मित्रांना पाठवू, अशी धमकी तरुणीला देण्यात आली असून या प्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय तरुणी ही हिंजवडी मधील एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी कंपनीत काम सुरू असताना तरुणीला व्हॉट्सअॅपवर अज्ञात व्यक्तीचा मेसेज आला. ‘तुझे खासगी फोटो माझ्याकडे आहेत. मला ब्लॉक करू नकोस, जर ब्लॉक केलेस तर तुझे खासगी फोटो मुंबईच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवणार’, असे मेसेजमध्ये म्हटले होते.

काही वेळाने त्याच क्रमांकावरुन तरुणीचा मॉर्फ केलेला फोटो देखील पाठवण्यात आला. हा फोटो तुझ्या मित्रांना पाठवणार आहे. असे नको असेल तर एका मिनिटाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ मला पाठव. तो मी कोणाला दाखवणार नाही, असा मेसेजही पाठवण्यात आला. यामुळे संगणक अभियंता तरुणी घाबरली होती. तसेच पोलिसात गेलीस तर बघून घेईल अशी धमकीही तिला देण्यात आली होती. शेवटी तरुणीने धाडस दाखवत निगडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपला व्हॉट्सअॅप असलेला नंबर किंवा नियमित वापरातील मोबाईल नंबर ठेवू नये. यामुळे अशा घटना टाळता येतील. तुमच्या सोशल नेटवर्कवर अनेकांचे लक्ष असते”, असे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:09 pm

Web Title: hinjewadi send video message 24 year old it engineer case file against unknown person
Next Stories
1 थकबाकी वसुली न झाल्यास पालिकेचे अंदाजपत्रक कागदावरच!
2 स्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास
3 विकासाला गती; पण फुगवटय़ाचा प्रश्न कायम
Just Now!
X