News Flash

वानवडीत भरदिवसा घरफोडी

आरती अरोरा (वय ५५, रा फातिमानगर) यांनी याबाबत वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पिस्तुलाचा धाक दाखवून चोरटे पसार

वानवडीतील फातिमानगर भागामध्ये बुधवारी भरदिवसा घरफोडी झाली. पळून जाणाऱ्या चोरटय़ांना पकडण्यासाठी महिलांनी आरडाओरड केली असता, चोरटे पिस्तुलाचा धाक दाखवून मोटारीतून पसार झाले.

आरती अरोरा (वय ५५, रा फातिमानगर) यांनी याबाबत वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अरोरा यांची फातिमानगरमधील समाधान सोसायटीत सदनिका आहे. आरती अरोरा व त्यांचे पती दोघेही डॉक्टर आहेत. बुधवारी दुपारी आरती आरोरा घराला कुलूप लावून शेजाऱ्यांकडे गेल्या होत्या. काही वेळाने त्यांच्या घराचा दरवाजा वाजल्याने काय झाले ते पाहण्यासाठी त्यांनी शेजाऱ्यांच्या घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटय़ांनी घराला बाहेरून कडी लावली होती. त्यामुळे मदत मागण्यासाठी त्या खिडकीत आल्या. त्या वेळी चोरटे पळून जाताना दिसले. त्यांनी आरडाओरड केल्याने काही नागरिकांनी चोरटय़ांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटय़ांनी पिस्तुलाचा धाक दाखवून मोटारीतून पळ काढला. या घरफोडीत रोख साडेतीन हजार, चांदीची नाणी असा नऊ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 4:15 am

Web Title: house robbery at pune
टॅग : House Robbery
Next Stories
1 टिळकांनी राजकीय दृष्टिकोनातून मराठी घडविली-डॉ. सदानंद मोरे
2 न्यायालयीन निर्णय, पर्यावरणवाद्यांमुळेच द्रुतगतीवर बळींच्या संख्येत वाढ-डी.एस.कुलकर्णी
3 अवचित पावसाने तारांबळ !
Just Now!
X