News Flash

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, मारहाणीत पत्नीचे दातच पाडले

पुण्यातील धक्कादायक घटना, नवऱ्याविरोधात तक्रार दाखल

घरात अनेकदा बायको आणि नवऱ्यात छोट्या छोट्या कारणांवरुन भांडण होत असतं. परंतु पुण्यात पत्नीने मटण बनवण्यासाठी दीड तास लागेल असं सांगितल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण करत तिचे दात पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकरन नाडार असं आरोपी पतीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध परिसरात प्रभाकरन नाडार हे आपल्या पत्नी सोबत राहतात. दोन दिवसांपूर्वी आरोपी प्रभाकरन हा दारू पिऊन घरी मटण घेऊन आला होता. त्यावेळी त्याने पत्नीला मटण बनवून दे, असे सांगितले. त्यावर पत्नी म्हणाली की, माझ्या हातात दुसरे काम असून त्यामुळे मटण तयार करण्यासाठी दीड तास लागेल. यावर संतापलेल्या प्रभाकरने एवढा वेळ कशासाठी लागेल असं विचारलं असता पत्नीने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नसल्याने प्रभाकरनला राग आला.

या रागातून त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचे दात पडल्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पती प्रभाकरन नाडार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2020 7:11 pm

Web Title: husband beat wife and broke her teeth after she says will take time to prepare mutton svk 88 psd 91
Next Stories
1 अभिजित बिचुकले इज बॅक; पदवीधर मतदारसंघातून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
2 पु. ल. देशपांडे यांना ‘गूगल’कडून मानवंदना
3 पुलंची संपूर्ण साहित्यसूची आजपासून ऑनलाइन
Just Now!
X