19 September 2020

News Flash

पुणे – पत्नीचा खून करून त्याने पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

दुसऱ्या पत्नीवरून अनेकदा पहिल्या पत्नीसोबत होत होता वाद

आरोपी हसनसहाब

पत्नीचा गळा आवळून खून करून आरोपीनं थेट पोलीस स्टेशन गाठत गुन्ह्याची कबुली दिल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. या प्रकारानंतर चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसऱ्या पत्नीवरून दोघांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांना प्रथमिक तपासातून मिळाली.

बानू हसनसहाब नदाफ (वय-३४) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर हसनसहाब (वय-४१) असे आरोपी पतीचे नाव आहे. हसनसहाबने काही वर्षांपूर्वी दुसरा विवाह केला होता. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होता. यातूनच खून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास हसनसहाब आणि पत्नी बानू यांच्यात राहत्या घरात दुसऱ्या पत्नी वरून वाद झाला. यातून हसनसहाबने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी हसनसहाब याने थेट चिंचवड पोलीस ठाणे गाठत पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, आरोपी ने २०११ ला दुसरा विवाह केला होता. यावरून पहिल्या पत्नी बरोबर अनेकदा वाद झाले होते. पहिल्या पत्नीचे तीन मुले आहेत. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 11:33 am

Web Title: husband murder wife in pimpri police nck 90
Next Stories
1 “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करा”
2 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात
3 न्यायालय आदेशानंतरही मुलांना भेटू न दिल्यास आता दंड
Just Now!
X