निसर्ग चक्रीवादळामुळे पावसाने आजही राज्यासह पुणे शहरात दमदार हजेरी लावली आहे. या जोरदार पावसामुळे पुणे शहरात २० ठिकाणी झाडपडीच्या आणि अनेक घरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत.
पुणे शहरात जोरदार पावसामुळे कोथरूड अग्निशमन केंद्रासमोरील बाजूला, विश्रांतवाडीत कस्तुरबा रुग्णालय, स्वारगेट पोलीस लाईन, विमाननगर, रामटेकडी, नळ स्टॉप, उजवी भुसारी कॉलनी, पाषाण पंचवटी, मुंढवा पिंगळेवस्ती, सॅलिसबरी पार्क, कोरेगाव पार्क आणि भांडारकर रोड यांसह अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.
तसेच अनेक सखल भागातील वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 3:46 pm