27 October 2020

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंत्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटले

शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अभियंत्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे संगणक एका अभियंत्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील  १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून नेल्याचे घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शनिवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास  ही घटना घडली असल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी जसवंत कुमार अगरवाल (वय- ४२) यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली असून, दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुळीग करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन परिसरात फिर्यादी जसवंत हे रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. दरम्यान, पाऊस सुरू झालेला असल्याने व त्यात लाईट नसल्याने अंधाराचा फायदा घेत दबा धरून उभा असलेल्या दोन अज्ञातांनी डाव साधला. या दोघांपैकी एकाने अगरवाल बंदुकीचा धाक दाखवला आणि त्यांच्या गळ्यातील अंदाजे ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून घेतली. यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेप्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत. पावसाळा आणि त्यात करोना विषाणूचे वातावरण असल्याने नागरिक रात्री नऊ वाजेनंतर घराबाहेर पडताना दिसत नाहीत. त्यामुळे याचा गैरफायदा चोरटे उचलत असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 10:17 am

Web Title: in pimpri chinchwad a computer engineer was robbed at gunpoint msr 87 kjp 91
Next Stories
1 VIDEO: मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचा इतिहास
2 राज्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी
3 पुण्यात दिवसभरात ४६ रुग्णांचा मृत्यू, नव्याने आढळले १९६८ करोनाबाधित
Just Now!
X