News Flash

धक्कादायक, पिंपरीत दोन श्वानांना पेट्रोल टाकून जाळलं, १२ श्वानांचा संशयस्पद मृत्यू

माणुसकीला लाजवणारी घटना, श्वानांना पोत्यात टाकून जाळलं

माणुसकीला काळिमा फासणारी घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. दोन श्वानांना जाणीवपूर्वक पेट्रोल टाकून जाळण्यात आले आहे. ही घटना शहरातील पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. 10 ते 12 श्वानांसह पिलांचा विषबाधेमुळे संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी श्वान प्रेमी कुणाल यांनी पोलिसात धाव घेतली आहे. गंभीर बाब म्हणजे, मादीच्या सहा पिल्लांचा देखील मृत्यू झाल्याचा संशय प्राणिप्रेमींना आहे.

प्राणी प्रेमी कुणाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव परिसरतील शिवनेरी गल्लीमध्ये दोन श्वानांना पेट्रोल टाकून जाळण्यात आलं असून इतर 12 भटक्या श्वानांचा विषबाधा होऊन संशयस्पद मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी घडली असून आज पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. रविवारी आणि आज एकूण 12 श्वानांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन श्नवानांना  पोत्यात टाकून जाळण्यात आलं आहे.

डिसेंबर महिन्यात पिंपळे गुराव सृष्टी चौक येथे भटक्या श्वानाला चौथ्या मजल्यावरून फेकून देण्यात आले होते. यात त्याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना इतर श्वानांना जाळून मारण्यात आल्याचे समोर आले आहे. याचा तपास होऊन त्या नराधम व्यक्तीला शिक्षा होणे महत्वाचं असल्याचं मत प्राणी प्रेमींनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 4:01 pm

Web Title: in pimpri chinchwad two dogs burn to death by unknown person kjp 91 dmp 82
Next Stories
1 …तोपर्यंत मनसेसोबत युती नाही; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
2 रश्मी वहिनींकडे तक्रार करणार असं म्हटलंच नाही – चंद्रकांत पाटील
3 इतिहासाच्या दृश्यमय दस्तावेजीकरणासाठी जुन्या चित्रांचे जतन आवश्यक -डॉ. श्रीकांत प्रधान
Just Now!
X