पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १८८० रुग्ण आढळल्याने, १ लाख ९ हजार ८३८ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या २०२२ रुग्णांची तब्बेत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ९० हजार ६०१ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.