News Flash

पुण्यात झोपडपट्टीला आग, १५ पेक्षा जास्त घरे जळून खाक

पुण्यातील काशीवाडी झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत १५ हून अधिक घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील काशीवाडी झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत १५ हून अधिक घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असल्याचे अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काशी वाडी झोपडपट्टी भागात आज संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यानुसार घटनास्थळी १७ गाड्याच्या मदतीने काही वेळामध्ये आग नियंत्रणामध्ये आणली. आगीत १५ हून अधिक घरे जळाली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:10 am

Web Title: in pune kashiwadi slum fire
Next Stories
1 ‘रेडीरेकनर’च्या दरात यंदा वाढ नको
2 पाऊस आणि गारपिटीचीही शक्यता
3 ‘स्टार’ कासव आणि पैशाचा पाऊस!
Just Now!
X