आंतरराष्ट्रीय योग दिवस

पुणे : करोना संसर्गातून बरे झालेले रुग्ण योगाभ्यासाला पसंती देत आहेत. करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये प्रकृतीच्या दीर्घकाळापर्यंत तक्रारी दिसून येतात. तसेच मानसिक आरोग्याचे प्रश्नही भेडसावतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी योगाभ्यास आणि प्राणायामाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे.

करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये श्वसन विकार, हृदयविकार, फु प्फु सांचे विकार दीर्घकाळापर्यंत आढळत आहेत. धाप लागणे, हृदयाचे ठोके  वाढणे अशा तक्रारी रुग्णांकडून नोंदवण्यात येत आहेत. या तक्रारींवर मात करण्यासाठी योगाभ्यास उपयुक्त ठरत असल्याने रुग्ण त्याकडे वळत आहेत.

अय्यंगार योगसाधना संस्थेचे संचालक अभय जवखेडकर म्हणाले, करोना संसर्ग झालेल्या तसेच करोनातून बरे झालेल्या शंभरहून अधिक रुग्णांना या वर्षभरात योगाभ्यासाचे धडे दिले. रुग्णांना दिसणाऱ्या कोविड पश्चात लक्षणांबरोबरच भीती, नैराश्य असे त्रासही दिसत आहेत. अय्यंगार योगाभ्यास पद्धतीतील काही आसने आणि प्राणायाम यांचा एकत्रित वापर रुग्णांना उपयुक्त ठरत आहे.

कोलंबिया एशिया रुग्णालयाच्या डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या, योगासनांमुळे शरीरातील सर्व पेशींमध्ये प्राणवायू पोहोचण्याची क्रिया सुलभ होते. योगाभ्यासामुळे तणावाचे व्यवस्थापन होते, तसेच पचनसंस्था, हृदयक्रिया सुरळीत राखणे शक्य होते. त्यामुळे करोनातून बरे झाल्यानंतर योगाभ्यास के ल्यास त्याचा उत्तम परिणाम दिसतो.

वेदिक्युअर हेल्थके अर अ‍ॅण्ड वेलनेसच्या डॉ. ज्योत्स्ना कदम म्हणाल्या, करोनानंतर श्वसन संस्था आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न गंभीर होतात. सौम्य ते मध्यम व्यायाम के ल्यास त्याचा उपयोग रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होतो. योगासने आणि मुद्रा करताना श्वासांच्या सुखासन, सर्वागासन करण्यास प्राधान्य द्यावे. ज्यांना सूर्य नमस्कार करण्याची सवय आहे त्यांनी काळजीपूर्वक सूर्यनमस्कार घालावे. शरीराच्या ताकदीचा अंदाज घेऊन आसने करावीत. खूप थकवा असल्यास ओढून- ताणून आसने करू नयेत.

योगाभ्यास कसा करावा

* योग प्रशिक्षकाशी शारीरिक आरोग्याचे प्रश्न, चिंता, भीती, नैराश्य याबाबत संवाद ठेवा.

* योगासने आणि प्राणायाम असे समीकरण ठेवल्यास त्याचा उपयोग करोनातून बरे झाल्यानंतर प्रकृती स्वास्थ्य मिळवण्यासाठी होतो.

* पोट किं वा छातीखाली आधार घेऊन के लेले शवासन, खुर्ची किं वा पलंग यांच्या आधाराने के लेले पूर्वोत्तानासन, पवनमुक्तासन, सुप्तबद्धकोनासन अशा आसनांचा उपयोग होतो.

* करोनातून बरे झालेल्यांनी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. मनाने योगासने करू नयेत.