खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग तूर्त थांबवण्यात आला आहे. दरम्यान, ऑक्टोबरअखेर किं वा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. सध्या चारही धरणांत मिळून एकू ण २९.१३ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.९४ टक्के  पाणीसाठा आहे. सोमवारी रात्रभर केवळ खडकवासला धरण परिसरात २० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, तर उर्वरित तिन्ही धरणांच्या क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली. दिवसभरात चारही धरणांच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतली. परिणामी खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग तूर्त थांबवण्यात आला आहे. धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन ऑक्टोबर महिनाअखेर किं वा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे.

याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, ‘सध्या परतीचा जोरदार पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्य़ातील सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठय़ाचे नियोजन ऑक्टोबरअखेर होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे. छ

शहराच्या वाढीव पाण्याबाबत चर्चा

पुणे महापालिके ची १७ टीएमसी पाण्याची मागणी असून ती मंजूर करण्याबाबत महापालिका आग्रही आहे. मात्र, जलसंपदा विभागाने लोकसंख्येचे प्रमाणीकरण करून देण्याचा आग्रह धरला आहे. पुण्याला ११.५० टीएमसी म्हणजेच दररोज ८९२ दशलक्ष घनफू ट (एमएलडी) पाणी कोटा मंजूर आहे. राज्य सरकारकडून जास्त पाणीकोटा मंजूर होईपर्यंत वर्षांला ११.५० टीएमसी याप्रमाणेच करार करण्यास महापालिके च्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

दहा धरणांमधून पाण्याचा विसर्ग

जिल्ह्य़ातील के वळ पिंपळगाव जोगे आणि माणिकडोह या दोन धरणांचा अपवाद वगळता अन्य सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे सध्या दहा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्य़ाच्या नऊ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्य़ाच्या सीमेवरील उजनी धरणातून भीमा नदीत ३० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.