28 September 2020

News Flash

पुण्यात किरकोळ वादातून मित्राची हत्या

पोलीस घटनास्थळी दाखल

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील नऱ्हे आंबेगाव परिसरात किरकोळ वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास सिंहगड पोलीस करीत आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. किरण काटकर वय 28 वर्ष असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथील अभिनव कॉलेज मार्गावर सर्व्हे क्रमांक 8 मधील मोकळ्या जागेतील पत्राच्या शेडमध्ये सोमवारी रात्री किरण आणि त्याचा मित्र पप्पू पाटील या दोघांमध्ये भाजी आणण्यावरून वाद झाला. या वादातून पहाटेच्या सुमारास आरोपीने किरण याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 1:56 pm

Web Title: killed person by frends in pune
Next Stories
1 दीड महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून दापोडीत १२ जणांनी केली तरुणाची हत्या
2 VIDEO: सोमवतीनिमित्त जेजूर गडावर चार लाख भाविकांकडून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’
3 मुलीला इंजिनीअर बनवण्याचं स्वप्न रेखाटणारा ६५ वर्षांचा बापमाणूस
Just Now!
X