पुण्यातील गोखलेनगर भागातील एका पीठ गिरणीत मेस चालक महिलेची ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुप्रिया संदीप प्रधान (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे.

गोखलेनगर परिसरात सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुप्रिया प्रधान या पीठ गिरणीत आल्या होत्या. दळण टाकताना त्यांची ओढणी गिरणीत अडकली. काही समजण्याच्या आत त्या गिरणीत ओढल्या गेल्या. त्यामध्ये प्रधान यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरीत नागरिकांनी जवळील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गोखलेनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.