13 August 2020

News Flash

सप्तश्रृंग गडावर दरड कोसळून पुण्यातील गाडीचे नुकसान

पुणे येथील भाविक वसंत घाटगे हे पत्नी जयश्री यांच्यासह कारने गडावर आले होते.

सप्तश्रृंगी देवीच्या गडावर घाट रस्त्यात रविवारी सकाळी सात वाजता दरड कोसळून पुणे येथील भाविकांच्या गाडीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

तालुक्यातील सप्तश्रृंगी देवीच्या गडावर घाट रस्त्यात रविवारी सकाळी सात वाजता दरड कोसळून पुणे येथील भाविकांच्या गाडीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. दरड व ढिगारा बाजुला केल्यानंतर गडावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या गडावर शनिवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली, ती रविवार सकाळपर्यंत कायम राहिली.

पुणे येथील भाविक वसंत घाटगे हे पत्नी जयश्री यांच्यासह कारने गडावर आले होते. दर्शन घेऊन ते परतत असताना घाटात अचानक उंचावरून मोठे दगड, माती कोसळली. या घटनेत घाटगे दाम्पत्यास कोणतीही इजा झालेली नसली तरी त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे वाहतूक काही वेळ बंद पडली. या घटनेची माहिती मिळाल्यावर गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, सनी जहागीरदार, राहुल बेनके, हेमंत कानडे, देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, त्यांचे कर्मचारी तसेच गडावरील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. रस्त्यावरील मोठे दगड व माती बाजुला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. सर्व काम झाल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वसंत घाडगे यांनी केवळ नशीब बलवत्तर म्हणून आपण वाचल्याचे नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2017 3:26 am

Web Title: landslide on saptashrungi fort damage car of pune
Next Stories
1 १४ वर्षांच्या मुलाचा ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू, पुण्यात ब्लू व्हेलचा पहिला बळी?
2 कळसावरून कामगार खाली कोसळला; दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या देखाव्याजवळील घटना
3 उत्सवी गर्दीला तरुणाईकडून शिस्तीचे धडे..
Just Now!
X