तुटवड्यामुळे प्रशासनाचा निर्णय

पुणे : हैदराबाद येथील कं पनीच्या रेमडेसिविर इंजेक्शनमुळे करोना रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात निदर्शनास आला होता. मात्र, संबंधित कं पनीच्या इंजेक्शनच्या पुरवठ्यास घालण्यात आलेली बंदी दोन दिवसांतच उठवण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना याच कं पनीकडून मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर पुरवण्यात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हैदराबाद येथील कंपनीच्या रेमडेसिविरमुळे दुष्परिणाम झाल्याने संबंधित कं पनीकडून होणारा पुरवठा थांबवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर शहरासह जिल्ह्यात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून सिप्ला कं पनीला अतिरिक्त पुरवठा करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, तरीदेखील मागणीपेक्षा कमी पुरवठा होत असल्याने संबंधित कं पनीला पुन्हा रेमडेसिविरचा पुरवठा करण्याबाबत कळवण्यात आले आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत होऊ शके ल, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘संबंधित कंपनीकडून रेमडेसिविरचा पुरवठा तूर्त बंद करण्यात आला होता. त्यामुळे तूट भरून काढण्यासाठी इतर कं पन्यांकडे अतिरिक्त पुरवठा करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र, या कं पन्यांकडून देखील मागणीच्या तुलनेत पुरेसा पुरवठा होत नसल्याने इंजेक्शनचा पुन्हा तुटवडा निर्माण झाला होता. रुग्णालये, रुग्णांच्या नातेवाइकांकडून इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत पुन्हा तक्रारी येत असल्याने हैदराबाद येथील कं पनीकडून पुन्हा पुरवठा सुरू करण्याबाबत कळवण्यात आले असून त्यांनीही पुरवठा सुरू के ला आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सदोष इंजेक्शनची चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’

दरम्यान, संबंधित कं पनीकडून सदोष पुरवठा करण्यात आलेले इंजेक्शन परत मागवण्यात आले असून त्यानंतर करण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा पुरवठा पूर्वीप्रमाणेच परिणामकारक असल्याची खात्री करण्यात आली आहे.

संबंधित कं पनीचा ठरावीक साठाच सदोष होता. त्यातील सदोष २३०० इंजेक्शन बाजूला काढण्यात आले आहेत. या कं पनीकडून दोन दिवसांपासून प्रतिदिन चार हजार इंजेक्शनचा पुरवठा सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून संबंधित कं पनीकडून करण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा पुरवठा खासगी रुग्णालयांना करण्यात आला आहे. नव्याने प्राप्त झालेल्या इंजेक्शनमुळे रुग्णांना दुष्परिणाम झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या नाहीत. त्यामुळे रेमडेसिविरबाबतची स्थिती पूर्वपदावर आली आहे. – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी