लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे ‘लोकमान्य महागणेशोत्सव-२०१३’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये नोंदणीकृत मंडळांच्या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला जाणार आहे.
महागणेशोत्सव स्पर्धा पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळे आणि नोंदणीकृत सहकारी गृहरचना संस्था अशा दोन विभांमध्ये होणार आहे. मंडळांतर्फे गणेशोत्सवाव्यतिरिक्त वर्षभर घेण्यात येणाऱ्या स्पर्धा आणि राबवण्यात येणारे विविध उपक्रम यांचा आढावा घेतला जाणार आहे. विजेत्यांना एक कोटी रुपयांपर्यंतची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला पारितोषिक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा १२ सप्टेंबर २०१३ ते ३१ मे २०१४ या कालावधीत घेण्यात येणार आहे. स्पर्धेसंबंधीच्या अटी किंवा अधिक माहिती आणि फॉम्र्स सोसायटीच्या २७ शाखांमध्ये १२ सप्टेंबर पासून उपलब्ध आहेत. मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मंडळांनी वर्षभर सामाजिक उपक्रम राबवावेत, यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे किरण ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘लोकमान्य महागणेशोत्सव’ या स्पर्धेचे आयोजन
लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे ‘लोकमान्य महागणेशोत्सव-२०१३’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 07-09-2013 at 02:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanya mahaganeshotsav competition by lokmanya multipurpose coop soc