21 September 2020

News Flash

‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकाला पारितोषिक

‘मसाप’च्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर

‘मसाप’च्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेमध्ये ‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकाला चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक’ जाहीर झाले आहे.

परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये शुक्रवारी (२० डिसेंबर) सायंकाळी सव्वासहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक आणि लेखक आनंद अंतरकर यांच्या हस्ते स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या दिवाळी अंकांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी यांनी दिली. या स्पर्धेसाठी या वर्षी महाराष्ट्रातून शंभर दिवाळी अंक आले होते. स्पर्धेसाठी बबन पोतदार आणि भालचंद्र कोळपकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, असे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी सांगितले.

स्पर्धेत ‘पुरुष उवाच’ या दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ रत्नाकर पारितोषिक, ‘संवाद सेतू’ या दिवाळी अंकाला मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक, ‘चौफेर समाचार’ या दिवाळी अंकाला शं. वा. किलरेस्कर पारितोषिक, डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘लिंग’ या दिवाळी अंकाला जाहीर झाले आहे.

‘छात्र प्रबोधन’ या दिवाळी अंकाला जानकीबाई केळकर स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट बालवाङ्मय दिवाळी अंकाचे पारितोषिक, तसेच दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ ‘इंद्रधनुष्य’ या दिवाळी अंकातील डॉ. राजश्री पाटील यांच्या ‘मोडला संसार-मोडला नाही कणा’ या कथेला जाहीर करण्यात आले आहे. उत्कृष्ट ललित लेखासाठीचे अनंत काणेकर पारितोषिक ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकातील नीलिमा जाधव बंडलू यांच्या ‘दिशा नावाचा माणूस’ या लेखाला जाहीर करण्यात आले आहे. गेली चाळीस वर्ष आरोग्य जागर करणाऱ्या ‘शतायुषी’ दिवाळी अंकाचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

प्रा. जोशी म्हणाले की, दिवाळी अंकांना ११० वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. दिवाळी अंक हा दीपोत्सवाच्या साक्षीने साजरा होणारा शब्दोत्सव आहे. मराठी भाषेची ही वैभवशाली परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गेली ५३ वर्ष दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. दर्जेदार दिवाळी अंकांचा सन्मान व्हावा तसेच नव्या दमाच्या आणि कसदार लेखन करणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन मिळावे, या भूमिकेतून ही स्पर्धा आयोजित केली जाते.

अंकात काय?

‘लोकसत्ता’ दिवाळी अंकात भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याच्या वाटचालीची माहिती देणारा ‘चिरंतन आनंदोत्सव’ हा सिद्धार्थ खांडेकर यांचा दीर्घ लेख आहे. ‘स्थलांतर’ या विषयाच्या विभागातील ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यासह अश्विन होंकण, अशोक नायगावकर, सुधीर गाडगीळ, अतुल देऊळगावकर, मैत्रेयी कुलकर्णी, विजय पाडळकर आणि अन्य काही लेख हे यंदाच्या अंकाचे वैशिष्टय़ आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन शतकोत्सवाच्या निमित्ताने एका विशेष विभागात शांता गोखले, माधव वझे, अभिराम भडकमकर, जयंत पवार यांचे लेखही या अंकात आहेत. ‘वेबविश्व’ विभागात नव्या मनोरंजन माध्यमांचा आढावा घेण्यात आला आहे, तर चरित्रपट हाही या अंकातील विभाग विशेष वाचनीय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:19 am

Web Title: loksatta diwali issue win award zws 70
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड : महिनाभरात डेंग्यूमुळे दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू
2 खासदार काकडे यांनी असं बोलायला नको होतं : आमदार मिसाळ
3 पुणे- दिवसाआड पाणी पुरवठा, मनसे महिला शहराध्यक्ष थेट पाण्याच्या टाकीवर
Just Now!
X