28 February 2020

News Flash

पेशवाई मिसळ

मिसळ हा असा पदार्थ आहे, की खरा मिसळप्रेमी दिवसभरात केव्हाही मिसळ खायला तयार असतो.

|| विनायक करमरकर

ज्यांना मिसळ आवडते त्यांच्यासाठी डेक्कन जिमखाना परिसरातलं पेशवाई हॉटेल हे एकदम योग्य ठिकाण आहे. मिसळ खाण्यातला आनंद इथे नक्की मिळतो.

मिसळ हा असा पदार्थ आहे, की खरा मिसळप्रेमी दिवसभरात केव्हाही मिसळ खायला तयार असतो. डेक्कन जिमखाना, गुडलक परिसरातल्या पेशवाई मिसळ या हॉटेलमध्ये तुम्हाला असं दृश्य नेहमी बघायला मिळेल. सकाळी साडेसात ते रात्री दहा अशी या हॉटेलची वेळ आहे आणि मुख्य म्हणजे इथे फक्त मिसळच मिळते. मिसळीचं हॉटेल सुरू करायचं तर इतर पदार्थ कशाला हवेत, इथे फक्त मिसळच देऊ या, असा विचार या हॉटेलच्या चालकांनी केला आहे. पेशवाईमध्ये तुम्हाला फक्त मिसळीचाच आस्वाद घेता येतो आणि इथली मिसळ खाणारा पुन्हा पुन्हा इथे येत राहतो, असा अनुभव आहे. थोडक्यात म्हणजे पुन्हा पुन्हा जाऊन खावीशी वाटते अशी ही मिसळ आहे.

मिसळ म्हटली, की खूप तिखट पदार्थ, त्याच्यावर तेलाचे तवंग असं चित्र पटकन डोळ्यापुढे येतं. तसा प्रकार इथे नाही. इथल्या मिसळीची एकदा चव चाखली की लगेच लक्षात येतं ते मिसळीबरोबर दिल्या जाणाऱ्या रस्सा किंवा र्तीचं वेगळेपण. तेलाचा तवंग नाही, भयंकर तिखटजाळही नाही आणि तरीही अतिशय चवदार असा इथला रस्सा असतो. उकडलेली मटकी, फरसाण, कांदा, लिंबू, चांगले मोठाले पाव आणि रस्सा अशी इथली मिसळीची डिश समोर आली, की या मिसळीचं वेगळेपण सहजच लक्षात येतं. मुख्य म्हणजे रश्श्याची एक छोटीशी बादलीच इथे आपल्या समोर येते. मिसळीबरोबर हवा तेवढा रस्सा मिळाला की मिसळप्रेमी खूश होतो. त्यामुळे इथली मिसळ खाण्यातला तो एक आनंद आहे.

आपल्या समोर रश्श्याची बादली आणि डाव आलेला असतो आणि आपण हवा तेवढा रस्सा मिसळीबरोबर घेत घेत इथे मिसळीचा आस्वाद घेऊ शकतो. इथे केवळ रस्साच हवा तेवढा मिळतो असं नाही तर मटकी, फरसाण, कांदा वगैरे तुम्हाला जे काही हवं असेल ते इथे दिलं जातं. इथे मिसळ खाण्याबरोबरच इथला रस्साही अगदी आवडीने मिसळीवर पुन्हा पुन्हा घेतला जातो. चारुशेठ मुदगल आणि संजय कुलकर्णी यांनी एक वर्षांपूर्वी हे हॉटेल सुरू केलं, तेव्हाच इथे फक्त कोल्हापुरी पद्धतीची आणि तशाच चवीची मिसळ द्यायची हे त्यांनी निश्चित केलेलं होतं. मिसळीबरोबर इतर पदार्थ इथे दिले जात नाहीत. इतर पदार्थ ठेवले असते तर मग ते स्नॅक्स सेंटर झालं असतं. पण आम्हाला तसं न करता फक्त मिसळच द्यायची होती. त्यामुळे दर्जेदार आणि चविष्ट मिसळ एवढीच डिश आम्ही देतो, असं ते सांगतात. कुलकर्णी यांना हॉटेल चालवण्याची आवडही आहे आणि दोन र्वष याच व्यवसायात ते कोल्हापुरात होते. त्यामुळे मिसळीसाठीचा रस्सा, त्याचे मसाले तसंच इतर सगळे पदार्थ कसे तयार करायचे याची त्यांना चांगली माहिती आहे आणि त्यात ते वाकबगार आहेत. डेक्कन जिमखाना परिसरात आल्यावर इथली मिसळ जो खाऊन जातो, तो या परिसरात आला की इथे पुन्हा नक्की येतोच, असा त्यांचा अनुभव आहे. स्वच्छता, उत्तम विनम्र सेवा आणि चव या गोष्टी इथे कटाक्षानं जपल्या जातात. त्यामुळेच बाहेरच्या मोठय़ा ऑर्डर्सही या मिसळीला नेहमीच येत असतात आणि ही मिसळ खवय्यांच्याही पुरेपूर पसंतीला उतरली आहे.

  • कुठे : डेक्कन जिमखाना (गुडलक चौक)
  • केव्हा : रोज सकाळी साडेसात ते रात्री दहा
  • संपर्क : २५५१३४५४

vinayak.karmarkar@expressindia.com

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on August 11, 2018 1:28 am

Web Title: loksatta food blog 5
Next Stories
1 पाहुणचार..
2 खिमा टोमॅटो सॅलड
3 खाऊ खुशाल : ‘उपवासाची थाळी’
Just Now!
X