26 October 2020

News Flash

शास्त्रीय गायकाशी गप्पांची संधी

‘सहज बोलता बोलता’मध्ये शुक्रवारी आनंद भाटे

संग्रहित छायाचित्र

किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्याशी  शुक्रवारी (३ जुलै) ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात गप्पांची संधी लाभणार आहे. भाटे यांच्याशी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत अभ्यासक पं. अमरेंद्र धनेश्वर संवाद साधणार आहेत. शुक्रवारी (३ जुलै २०२०) सायंकाळी पाच वाजता हा वेब संवाद रंगणार आहे.

अमरेंद्र धनेश्वर हे आनंद भाटे यांच्याशी संवाद साधणार आहेत. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांची गायकी पुढे नेणारे गायक असा आनंद भाटे यांचा लौकिक आहे.

स्वरभास्करांच्या घराणेदार तालमीने भाटे यांच्या गायनातील फुललेला बहर रसिकांना आनंद देत आहे. विद्यार्थिदशेमध्येच आपल्या मधुर आवाजाने स्वरमंच गाजविलेल्या आनंद भाटे यांना त्या वेळी ‘आनंद गंधर्व’ ही उपाधी मिळाली होती. संगीत रंगभूमीचे नटसम्राट बालगंधर्व यांच्यावरील चरित्रपटामध्ये रुपेरी पडद्यावरील बालगंधर्व यांच्या नाटय़पदांना आनंद भाटे यांचा स्वर लाभला होता.

आनंद भाटे यांच्या स्वरांतून अभिजात संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीतातील विविध प्रकार, भजन, अभंग, नाटय़पदे असे विविध रंग रसिकांनी अनुभवले आहेत. उत्तम गायनाबरोबरच संगीत नाटकांतून त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना आनंद दिला आहे.

सहभागासाठी..

https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_3July  या लिंकवर जाऊन नोंदणी करा. त्यानंतर आमच्याकडून तुम्हाला ई-मेल आयडीवर संदेश येईल. याद्वारे ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता या वेब संवादात सहभागी होता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:02 am

Web Title: loksatta sahaj bolta bolta anand bhate on friday in abn 97
Next Stories
1 गोखले संस्थेत ऑनलाइन परीक्षा
2 पुण्यात अर्ध्या तासात होणार करोना टेस्ट, रॅपिड अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध
3 जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पादुका पंढरीला घेऊन निघाली सजलेली ‘लालपरी’
Just Now!
X