News Flash

पुण्याला अर्थसंकल्पातून काय मिळालं?; वाचा महत्त्वाच्या घोषणा

अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी काय केल्या घोषणा?

प्रातिनिधीक छायाचित्र

महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडला. २०२१-२२ या वर्षासाठीच्या या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, सध्या सुरू असलेल्या उपक्रमांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील काही शहरांच्या विकासासाठी सरकारकडून काही घोषणा केल्या आहेत. पुण्यातील महत्त्वाच्या प्रकल्पासाठीही अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी घोषणा आणि तरतूदी केल्या आहेत.

१) पुणे, नगर, नाशिक जलद रेल्वेला मंजुरीः पुणे-अहमदनगर-नाशिक या शहरांदरम्यान जलद रेल्वेला मंजूरी देण्यात आली आहे. २३५ किमी लांबीचा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार असून, या रेल्वे मार्गासाठी १६ हजार १३९ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

२) पुण्यात आठ पदरी रिंग रोडची उभारणी : पुण्यातील वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची घोषणा आज करण्यात आली आहे. पुण्याबाहेरुन रिंग रोडची उभारणी काळाची गरज आहे, असं सांगत त्यासाठी १७० किमी लांबीच्या २६ हजार कोटींच्या आठ पदरी रिंग रोडचे काम करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादनाचं काम याच वर्षी हाती घेण्यात येईल. या रिंग रोडमुळे पुण्यातील ट्रॅफिकची समस्या सुटू शकते, असं अजित पवार यांनी नमूद केलं.

३) ससूनसाठी २८ कोटी २२ लाख : अर्थसंकल्पात राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील ससून रुग्णालयात कार्यरत वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी २८ कोटी २२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिल्याची घोषणा पवार यांनी केली.

४) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साडेदहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गांचा तसेच २ किलोमीटर लांबीच्या २ पुलांचा समावेश असलेल्या ६ हजार ६९५ कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांचे बांधकाम सुरु असून, ते डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.

५) पुणे शहरात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

६) देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले असून, त्याची घोषणा अजित पवार यांनी केली. सध्या पुणे जिल्ह्यात बालेवाडी येथए क्रीडा संकुल सुरू आहे. या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 4:43 pm

Web Title: maharashtra health budget 2021 announcement about pune what is for pune in the budget ajit pawar bmh 90
Next Stories
1 महिला दिन विशेष: २१ व्या शतकातील हिरकणी… नऊवारी नेसून सात मिनिटांमध्ये सर केला नागफणी सुळका
2 महिला दिन विशेष : खो खोचे मैदान ते पुण्यात सहायक पोलीस निरीक्षक; सुजाता शानमेंचा प्रेरणादायी प्रवास
3 महिला आमदार समाजमाध्यमांवर ‘दिनविशेष’ पुरत्याच!
Just Now!
X