पुणे : रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतले अथवा गैरवर्तन केले, अशा प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण आता जलद होणार आहे. रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) यासाठी पाऊल उचलले आहे. प्रवासी १ जूनपासून व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर थेट तक्रार नोंदवू शकणार आहेत. त्यावर आरटीओकडून तातडीने कारवाई केली जाणार आहे.

शहरात रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याच्या तक्रारी प्रवासी नेहमी करतात. याचबरोबर अनेक रिक्षाचालक जवळच्या अंतराचे भाडे नाकारतात अथवा त्यासाठी भाड्यापेक्षा जास्त पैसे मागतात. अनेक जण मीटरने जाण्याऐवजी अव्वाच्या सव्वा रक्कम सांगून प्रवाशांची लूट करतात. मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मात्र, तक्रार करावयाची झाल्यास ती कशी करावयाची हा मूळ प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहतो. लेखी तक्रार देण्यासाठी आरटीओमध्ये जाण्यात त्यांना वेळ घालवावा लागतो.

Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
IAS Whatsapp Group Controversy
IAS Whatsapp Group Controversy : IAS अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून मोठा गोंधळ; केरळ सरकार करणार चौकशी, तर फोन हॅक झाल्याचा अधिकाऱ्याचा दावा
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
vehicle dragging police
संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना
Shocking video : A rickshaw caught fire due to firecrackers
धक्कादायक! फटाक्यामुळे धावत्या रिक्षाला लागली भररस्त्यात आग, संभाजीनगरचा VIDEO होतोय व्हायरल
Mobile Phone Slips Into Boiling Oil
Mobile Blast News: जेवण बनवताना तरी मोबाइल दूर ठेवा! गरम तेलाच्या कढईत मोबाइल पडून झाला स्फोट, युवकाचा दुर्दैवी मृत्यू

हेही वाचा – कोल्हापुरात महालक्ष्मी चरणी लाखभर भाविक

आता आरटीओने रिक्षाचालकांच्या विरोधातील तक्रारी प्रवाशांना सहजपणे करता याव्यात यासाठी व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांची तक्रार या क्रमाकांवर केल्यानंतर आरटीओचे अधिकारी या तक्रारींची शहानिशा करतील. ही शहानिशा झाल्यानंतर तातडीने दोषी आढळणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल. या व्हॉट्सॲप हेल्पलाइनमुळे नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवरील कारवाईची प्रक्रिया जलद होणार आहे.

गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत आरटीओकडून २ हजार ४९५ रिक्षांची तपासणी करण्यात आली होती. त्यात १ हजार ६१३ रिक्षाचालक दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यात भाडे नाकारल्याप्रकरणी ९० जणांवर कारवाई करण्यात आली होती. याचबरोबर मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या ७२ जणांवर आणि जादा भाडे आकारणाऱ्या ६० जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच, ५७ चालकांवर प्रवाशांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी कारवाई झाली.

हेही वाचा – कोल्हापुरातील रंकाळा तलावाची रया गेली; विद्रुपीकरण खंतावणारे

रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. भाडे नाकारणे अथवा जादा भाडे आकारणी या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण जलद गतीने करण्यासाठी व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक १ जूनपासून सुरू करण्यात येत आहे, असे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.

अशी होईल कारवाई…

नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकाचे छायाचित्र, चित्रफीत व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर प्रवासी पाठवू शकतात. त्यानंतर आरटीओतील अधिकारी संबंधित रिक्षाचालक आणि प्रवासी या दोघांची बाजू जाणून घेतील. ते पुरावे पडताळून रिक्षाचालकाने नियमभंग केला की नाही, याची तपासणी करतील. रिक्षाचालकाने नियमभंग केलेला आढळल्यास तातडीने त्याच्यावर कारवाई केली जाईल.