News Flash

पुण्यात महात्मा फुलेंची जयंती उत्साहात साजरी

महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती शहरात गुरुवारी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संघटनांच्या वतीने समताभूमी येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

| April 12, 2013 01:35 am

महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती शहरात गुरुवारी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संघटनांच्या वतीने समताभूमी येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
महात्मा फुले यांच्या १८७ व्या जयंतीनिमित्त दत्तवाडी येथील आनंद मंडळ, बहुजन विकास महासंघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, भारिप बहुजन महासंघ, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि मातंग समाज या संघटनांतर्फे गंज पेठेतील समताभूमी येथील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. मातंग समाजाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुलेंची ‘सत्याची कविता’ सादर केली. पुणे विद्यापीठातही प्रशासकीय इमारतीसमोरील म. फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:35 am

Web Title: mahatma phules 187th birth anniversary celebrated
Next Stories
1 पिंपरीतील बसथांबे, बीआरटीएस स्थानक अन् २४ तास पाणीपुरवठा!
2 प्रयत्न करूनही अजून कुष्ठरोगाचे निवारण नाही – उपराष्ट्रपती
3 शि.प्र. मंडळीस दिलेला भूखंड पिंपरी प्राधिकरणाने काढून घेतला
Just Now!
X