04 March 2021

News Flash

पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रकची सात ते आठ वाहनांना धडक

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

पुण्यात भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना धडक दिली आहे. नवले ब्रीजवर पुणे-बंगळुरु महामार्गावर हा अपघात झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्याने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली अशी माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ट्रक साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं. यावेळी समोर असणाऱ्या तसंच तिथे रस्त्याशेजारी उभ्या असणाऱ्या वाहनांना ट्रकने धडक दिली. अपघातामुळे काही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळासाठी तिथे वाहतुकीचा खोळंबाही झाला होता. दरम्यान अपघातात सहा ते सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 3:02 pm

Web Title: major accident in pune sgy 87
Next Stories
1 फिर्यादीनंच अपहरण करुन मारहाण केली; हर्षवर्धन जाधवांचे न्यायालयात गंभीर आरोप
2 रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक
3 तुमच्यासाठी कायपण! पुण्यातील कार्यकर्त्यांच्या १२५ फुटी ‘शुभेच्छा बॅनर’ची महाराष्ट्रभर चर्चा
Just Now!
X