मुंबईत ९ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सुरुवात झाली.

मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून ही रॅली शहरातील विविध भागातून डेक्कन येथील संभाजी महाराज यांच्या पुतळयाजवळ समाप्त होणार आहे. आज या रॅलीत तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभाग झाला आहे.

मराठा समाजाला सरकारने तात्काळ आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी जे निकष तयार करण्यात आले आहेत ते रद्द करण्यात यावेत. महिलांच्या सुरुक्षेसाठी सरकारने कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी करावी. यांसह अनेक मागण्यांचे फलक घेऊन तरुण-तरुणी दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाला होते.

पुण्यात दुचाकी रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाल्याने मुंबईच्या मोर्चाकड़े सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.