20 September 2020

News Flash

ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव कालवश

शनिवार पेठेतील अमेय अपार्टमेंट येथे गेल्या १५ वर्षांपासून जाधव यांचे वास्तव्य होते.

मराठी वाङ्मयातील सर्व प्रवाहांचे खुल्या मनाने स्वागत करणारे ज्येष्ठ समीक्षक-कवी, माजी संमेलनाध्यक्ष आणि साधना ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. रावसाहेब गणपतराव ऊर्फ रा. ग. जाधव (८३) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी पहाटे निधन झाले. प्रा. जाधव यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अन्त्यसंस्कार करण्यात आले.

शनिवार पेठेतील अमेय अपार्टमेंट येथे गेल्या १५ वर्षांपासून जाधव यांचे वास्तव्य होते. सहा महिन्यांपूर्वी घरामध्ये पाय घसरून जाधव पडले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. तीन महिन्यांपूर्वी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी प्रा. रा. ग. जाधव यांना घरी येऊन िवदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता. त्यानंतर सव्वा महिन्यांपूर्वी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वार्धक्यामुळे प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना दहा दिवसांपूर्वी घरी आणण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची हालचाल मंदावली होती. अखेरीस शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

जाधव यांचे पार्थिव सकाळी साडेदहाच्या सुमारास साधना मीडिया सेंटर येथे अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी जाधव यांच्या पार्थिवाचे अन्त्यदर्शन घेतले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृह येथे साडेअकरा वाजता जाधव यांचे पार्थिव दहा मिनिटे अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. जाधव यांच्या अंतिम इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साधना ट्रस्टतर्फे सोमवारी (३० मे) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता प्रा. रा. ग. जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 3:22 am

Web Title: marathi literary critic r g jadhav passes away 2
Next Stories
1 दिलीप चौधरी यांचे निधन
2 निगडीतील अपघातानंतर ट्रकमधील सिलिंडरच्या स्फोटाने घबराट
3 मिश्कील आणि निरागस जाधवसर
Just Now!
X