07 June 2020

News Flash

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन विवाहित महिलेची आत्महत्या..

सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

विवाहितेची आत्महत्या

सासूच्या त्रासाला कंटाळून एका 28 वर्षीय नवविवाहित महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना पिंपरीतल्या भीमनगर येथे रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली. पुष्पा हर्षद लोखंडे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून सासरच्या छळामुळे पुष्पाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा तिच्या कुटुंबाने आरोप केला आहे.अजूनतरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.मात्र अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुष्पा लोखंडेचं नुकतंच लग्न झालं होतं. ती तिच्या माहेरी आली होती. वाळत घातलेले कपडे घेण्यासाठी जाते म्हणून पुष्पा तिसऱ्या मजल्यावर गेली होती. तिने अचानक हे टोकाचे पाऊल उचलले आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. यात पुष्पा गंभीर जखमी झाली होती. तिच्या घरच्यांनी तिला तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पुष्पा लोखंडे हिचा विवाह हर्षद याच्याशी महिन्याभरापूर्वी झाला होता. काही दिवसापूर्वी माहेरी आल्यानंतर सासू त्रास देत असल्याची तक्रार माहेरच्यांकडे पुष्पाने केली होती. याबद्दल माहिती पुष्पाच्या कुटुंबीयांनी दिली. असं असलं तरी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून केवळ अकस्मात मृत्यूची नोंद पिंपरी पोलिसात केली गेली आहे. पुष्पाचे माहेर हे पिंपरी चिंचवडमधील दिघीमध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2017 8:07 pm

Web Title: married woman commits suicide
Next Stories
1 पुण्यात प्रेमी युगुलाची खाणीत उडी मारून आत्महत्या
2 देहुरोड परिसरात सशस्त्र टोळक्यांकडून ९ ते १० वाहनांची तोडफोड
3 मांजर फेकल्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेचा मारहाणीत मृत्यू
Just Now!
X