पुणे शहरातील हडपसर आणि रामटेकडी परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कचरा प्रकल्पास भीषण आग लागल्याची घटना घडली असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हडपसर आणि रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील कचरा प्रकल्पास आग लागल्याची माहिती मिळाली. या प्रकल्पाच्या अगदी काही अंतरावर बैठी घरे असून त्यामुळे तेथील नागरिकांना त्रास होता कामा नये. त्या पार्श्वभूमीवर तात्काळ काही मिनिटात सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोवर आगीने रौद्र रूप धारण केल्याने, आणखी पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यावर चार ही बाजूने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. मात्र या आगीचे नेमके कारण अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.