अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारपासून सुविधा

पुणे : पुणे-दौंड मार्गावर ८ एप्रिलपासून शटलऐवजी विजेवर धावणारी मेमू लोकल सोडण्यात येणार आहे. या गाडीमुळे पुणे-दौंड मार्गावरील प्रवास वेगवान होणार आहे. सध्या ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
heavy vehicles ban on Mumbai Pune Expressway for three days
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

पुण्याहून दौंडसाठी सकाळी ७.०५ आणि संध्याकाळी ६.४५ वाजता गाडी सोडण्यात येणार आहे. ती अनुक्रमे सकाळी ८.४३ आणि रात्री ८.२३ वाजता दौंड स्थानकावर पोहोचेल. दौंड स्थानकातून पुण्यासाठी सकाळी ७.०५ आणि संध्याकाळी ६.१५ वाजता गाडी सोडण्यात येईल. ती अनुक्रमे सकाळी ८.४३ आणि संध्याकाळी ७.५३ वाजता दौंड स्थानकावर पोहोचेल. पुणे- दौंड मार्गाचे विद्युतीकरण झाल्यापासून या मार्गावर विजेवर धावणारी लोकल सोडण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपूर्वी या मार्गावर डिझेलवर धावणारी डेमू गाडी सोडण्यात आली होती. आता विजेवरील गाडी धावणार असल्याने प्रवासाचा वेळ काही प्रमाणात कमी होऊ शकणार आहे.

मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाकडून स्वागत करण्यात आले आहे. संघटनेचे सचिव विकास देशपांडे यांनी याबाबत सांगितले, की संघटनेच्या माध्यमातून आम्ही यासाठी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत होतो. त्यातून मेमू गाडीला मंजुरी मिळाली. सध्या आठ डब्यांची मेमू लोकल धावणार आहे. सध्या करोनामुळे सर्वच प्रवासी प्रवास करू शकत नाहीत. मात्र, पुणे-दौंड दरम्यान प्रवाशांची संख्या लक्षात घेता भविष्यात आणखी सात डबे वाढवावे लागतील. म्हणजेच एकूण १५ डब्यांची मेमू लोकल करून तिच्या फेऱ्या वाढविण्याची आवश्यकता आहे.