News Flash

पुण्यात अल्पवयीन मुलीस चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी; गुन्हा दाखल

या प्रकरणी १६ वर्षीय मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे

crime-1
(प्रातिनिधीक फोटो)

पुण्यात येरवडा येथील गाडीतळ परीसरात राहणार्‍या ४५ वर्षीय व्यक्तिने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली आहे. तू माझ्याशी लग्न न केल्यास तुला घरात घुसून मारेल, तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड फेकेल, अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मोहम्मद हुसेन खान (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा गाडीतळ परिसरात ४५ वर्षीय आरोपी मोहम्मद हुसेन खान हा राहण्यास आहे. त्याच्या घराजवळ राहणार्‍या १६ वर्षीय मुलीस जून २०२१ ते २७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत तिला मानसिक त्रास दिल्याची घटना घडली आहे. या तीन महिन्याचा कालावधीत आरोपी तिला येता – जाता प्रपोझ करायचा. तुझे वय १८ वर्ष होईपर्यंत मी वाट पाहीन. तू माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावायाचा. दरम्यान त्याने थेट चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुणे: जातपंचायतीकडून घटस्फोट न घेतल्याने बहिष्कार; पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना

या प्रकरणी १६ वर्षीय मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी ओरोपी विराधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 8:09 pm

Web Title: minor girl was threatened with acid pune crime news pune police action filed a crime svk 88 srk 94
Next Stories
1 राजू शेट्टींनी करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
2 “ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचंच सरकार,” संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
3 बाळासाहेब जेव्हा जाहीर सभेदरम्यान राज ठाकरेंना म्हणाले होते, “तू बोलतोस की मी जाहीर करू….”
Just Now!
X